Thursday, March 22, 2007

वकील

नव्वदीतले जांबुवंतराव जमदग्नी मृत्यूशय्येवर होते. गेली ४० वषेर् त्यांच्यावतीने प्रॉपटीर्चा खटला लढवलेल्या अॅडव्होकेट आडदांडांना त्यांनी बोलावून घेतले. खोल गेलेल्या आवाजात त्यांनी विचारलं, ''मला वकील व्हायचंय. काय करावं लागेल?'' '' अहो, पण, एकदम अचानक हे काय मनात खूळ भरलंय तुमच्या?'' '' ते मी तुम्हाला नंतर सांगेन. पण, मला वकिलीची डिग्री हवी आहे. ताबडतोब. एखाद्या फोकनाड युनिव्हसिर्टीतून ती विकत घ्यावी लागली तरी चालेल. मी हवे तेवढे पैसे देईन तिच्यासाठी.'' आडदांड वकिलांनी ५० हजार रुपये मोजून खस्मानिया विद्यापीठाची डिग्री मिळवली जांबुवंतरावांची. ती डिग्री पाहताक्षणी जांबुवंतरावांचा चेहरा आनंदानं खुलला. त्यावर अतीव समाधान पसरलं. पाठोपाठ लगेच त्यांना खोकल्याची भयानक उबळ आली, ते तळमळू लागले. आता त्यांचा अंत जवळ आलाय, हे ओळखून आडदांड पुढे सरसावले. त्यांनी विचारलं, ''जांबुवंतराव, तुम्ही मृत्यू इतका समीप आलेला असताना वकील का बनलात इतक्या तातडीनं?'' जांबुवंतरावांच्या शेवटच्या श्वासातून घरघरत अखेरचे शब्द बाहेर पडले, ''जगातून एकतरी वकील नष्ट करण्याचा तोच मार्ग होता...''

- मामंजी

A blog containing Inspirational Poems and tickeling four liners