Tuesday, January 27, 2015

देव बाप्पा झाला प्रसन्न

देव झाला प्रसन्न आणि समोर आला तथास्तु म्हणत
पण वत्सा "कंडी शन अप्लाय" हे ठेवा बर ध्यानात
भक्त गडब डला आणि विचारू लागला
देवा स्वर्गात पण हा "फंडा " कधी इम्प्लीमेंट झाला
देव म्हणाला "अरे आज काल औथरि टी बदललीय
मग अशी युक्ती देवांच्या पॅनेल ने ठरवलीय
वरदान सुद्धा "इन्स्टॉल मेण्ट " मध्ये द्यावे लागते
नाहीतर "भस्मासुर " निर्माण होण्याची भीती असते
प्रत्येकालाच हवा असतो आश्वासनाचा मेवा
हरवलाय कुठे तरी सामाधानांचा ठेवा
तुमचे बरे आहे तुम्ही कलियुग कलियुग म्हणु शकता
मी डोळे बंद करून बसू शकत नाही ना भक्ता
काय करू आताशा देव होण्याचा पण कंटाळा आलाय
रिटायर होवून कैलासा वर सेटल होण्याचा प्लान केलाय
Visit Us at

A blog containing Inspirational Poems and tickeling four liners