Sunday, August 31, 2008

Va. Pu. Kale. वपूर्झा

एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पण पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमिनीवरच आहोत

लेखन ● व. पु. काळे (http://www.davbindu.com/marathi_lekh_va_pu_kale.htm)

Saturday, April 7, 2007

क्रिकेट : गोल गट्टम लकड बट्टम दे दणादण
टेबल टेनिस : लकडी के फलकक्षेत्र पे ले टकाटक दे टकाटक
लॉन टेनिस : हरित घास पर ले तडा तड दे तडा तड
लाइटचा बल्ब : विद्युत प्रकाशक काँचगोलक
टाय : कंठलंगोट
माचिस : रगडमपट्टी अग्निउत्पादन पेटी
ट्रॅफिक सिग्नल : आवत जावत सूचक झंडा
चहा : दुग्धजलमिश्रित शर्करायुक्त पर्वतीय बूटी
ट्रेन : सहस्त्रचक्र लोहपथगामिनी
सर्व मार्गांवरचा पास : अत्र तत्र सर्वत्र गमन आज्ञापत्र
रेल्वे सिग्नल : अग्निरथ आवागमन सूचक लोहपट्टिका
रेल्वे सिग्नल : लोह पथ गामिनी आवागमन सूचक यंत्र
बटण : अस्ताव्यस्त वस्त्रनियंत्रक
मच्छर : गुंजनहारी मानवरक्तपिपासू


(म.टा. च्या सौजन्याने)

For more like this visit www.davbindu.com

A blog containing Inspirational Poems and tickeling four liners